डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

जासई विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

| उरण । वार्ताहर ।
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. या प्रसंगी विद्यालयाच्या परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  सुरेश पाटील, अरुण घाग, संतोष घरत, नरेश घरत, बळीराम घरत, गोपीनाथ ठाकूर, दत्ता घरत, गणेश पाटील, जयश्री कांबळे, सुरेश ठाकूर अनेक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने विद्यालयात कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

उमरोली जनरेटर भेट

| नेरळ । वार्ताहर ।
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील डिकसळ येथील शांतिदूत मंडळ यांना विजेच्या व्यवस्थेसाठी जनरेटर भेट दिले आहे.


उमरोली ग्रुप ग्रामपंचायत कडुन दिला जाणारा 15 टक्के निधी ग्रामपंचायतमधील उमरोली, आषाणे, वावे, उमरोली या गावातील अनुसूचित जातीमधील ग्रामस्थांना विविध वस्तू यांचे वाटप केले. यावेळी प्रसाद भासे, रामलाल चौधरी, तेजस भासे, भारती पाटील, नितीन गायकवाड, प्रमोद वाघमारे, रेखा साळवी, हिराबाई हिरे, रेखा गायकवाड, संगिता गायकवाड, शोभा चव्हाण, तनुजा गायकवाड, कल्पना हिरे, अर्चना गायकवाड, मोनिका गायकवाड, अमर ठाणगे, जयेश बोराडे, गणपत पिरकड यांची उपस्थिती होती.

तळा तालुक्यात विविध कार्यक्रम

| तळा । वार्ताहर ।
तळा शहरात भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन सेवा संस्था व बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.


तसेच सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तळा नगरपंचायत अशी बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.तसेच शिवकालीन लाठीकाठी मर्दानी खेळाचे देखील सादरीकरण करण्यात आले.नगरपंचायत प्रांगणात सरणतय झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

। सोगांव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य वस्सीम कुर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त सोगांव-सिद्धार्थ नगर येथील तक्षशिला बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सर्व बौद्ध बांधवांना शुभेच्छा देत आपण समाजाच्या उन्नतीसाठी सदैव सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

रिक्षाचालकाकडून मोफत वाहतूक

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वदप गावातील भीमराव गायकवाड या रिक्षाचालक असलेल्या आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते यांनी प्रवाशांना मोफत रिक्षा वाहतूक सेवा दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात आणि जांभिवलीकडे जाणार्‍या प्रवाशी यांच्यासाठी मोफत प्रवासी सेवा दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त कर्जत नगरपरिषद क्षेत्रामध्ये प्रवासी सेवा देत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी सलग दुसर्‍या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत प्रवासी सेवा देत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या रिक्षाच्या मागे आणि पुढे मोफत सेवा देण्याचे फलक लावले होते. त्यामुळे सकाळपासून गायकवाड या रिक्षाचालक असलेल्या चालकाच्या सेवा देण्याचे काम केले.

Exit mobile version