अल्कालाईन पाण्याचा वापर करा

डॉ.जयपाल पाटील यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

| कोर्लई | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात असलेले शेतघर, गाई-म्हशीचा गोठा, नारळ, आंबा बागायत यांना आग लागून अतोनात नुकसान होते. यासाठी शेताच्या सभोवार बांधापासून आपल्या शेताकडील बाजूस जेसीपी लावून 5 फूट खोल चर खणून घ्यावा. काढलेल्या मातीवर बहुगुणी शेवगा, नारळ, हापूस आंबे लावून आर्थिक उन्नती करावी व आगीमुळे होणारी आपत्ती थांबवावी. तसेच, आरोग्य सुरक्षेसाठी अल्कालाईन पाण्याचा वापर करा, असे मार्गदर्शन छ. श्री शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावतीचे राष्ट्रीय संचालक, रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले. ते डेस्टिनीशन फॉरेस्ट अँग्रो टुरिस्ट सेटंर, सांबरीने आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. प्रारंभी डॉ. जयपाल पाटील यांच्या हस्ते अल्कालाईन वॉटर संचाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व्याख्याते प्रफुल्ल पाटील, जिल्हा परिषद रायगड, संयुक्ति सनव्हिरो पुणेचे मालक तुषार जगदाळे, कंत्राटदार जोशी, नवेनगर,वायरमन नरेंद्र ठाकूर, आवेटी, गंवडी, विजय पाटील, सांबरी, सागरगड शेतकरी महासंघाचे मोहन पाटील, खजिनदार, सदाशिव बाळाराम म्हात्रे, शशिकांत नारायण पाटील उपाध्यक्ष मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये मेळावा आयोजक प्रगतिशील शेतकरी संतोष पाटील यांनी त्यांच्या शेतावर कृषी पर्यटनामध्ये 100 रुपयात पोटभर शाकाहारी व मांसाहारी जेवण, 15 हजार रुपयांपर्यंत निवास, चहा, नाश्ता, भोजन, वृध्दाश्रम आणि आरोग्यदायक अल्कालाईन पाणी जनतेसाठी अल्प दरात उपलब्ध करीत असल्याचे सांगितले.

यानंतर डॉ. जयपाल पाटील यांनी शेतकऱ्यांनी आपली शेतकरी नोंद करून घेणे आवश्यक असून पुढे केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना मिळतील. वर्षभर आपल्या जमिनीनुसार किसान क्रेडिट कार्डवर वर्षभर बिनव्याजी पैसे वापरास मिळतात ते काढून घ्यावे, प्रत्त्येक शेतावर गमबुटचा वापर सुरक्षेसाठी करावा. त्यामुळे साप, विंचू चावणार नाहीत. चुकून चावलाच तर108 रुगणवाहिकेस बोलावून जिल्हा रुग्णालयात नेणे तसेच, महिला सुरक्षेबाबत महाराष्ट्र पोलीस 112 क्रमांकवर संपर्क साधून सुरक्षित रहावे, असे सांगितले.

Exit mobile version