| चिरनेर | प्रतिनिधी |
पेण येथील डॉ. एल.डी. पाटील (69) यांचे नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पेण येथील स्मशानभूमीत 4 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. युवराज पाटील यांचे ते पिताश्री होते. तर चिरनेरचे प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र खारपाटील व उद्योगपती पी.पी. खारपाटील यांचे ते व्याही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित पुत्र, एक विवाहित कन्या, सून, जावई व दोन नाती असा आप्त परिवार आहे. मूळचे पेण तालुक्यातील दादर येथील रहिवासी असणारे डॉ. एल.डी. पाटील यांचे कुटुंब सध्या पेण येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला वैद्यकीय क्षेत्राबरोबर राजकीय, सामाजिक, उद्योग, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती.