। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावमधील डॉ. तझिन रहाटवीलकर यांना स्टेट बँक ऑफ इंडिया माणगाव शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला पुरस्काराने गुरुवारी (दि.13) त्यांच्या निवासस्थानी सन्मानित करण्यात आले. डॉ.तझिन रहाटवीलकर कॉसपोटो लॉजिस्ट त्वचा रोग तज्ञ डॉक्टर म्हणून सर्वत्र परिचित आहेत. माणगाव मोर्बारोड मार्गावरील खांदाड गावच्या हद्दीत डॉ.इस्माईल रहाटवीलकर व डॉ. तझिन रहाटवीलकर यांचा अल्फा हॉस्पिटल नावाने मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात त्वचा रोग तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. तझिन रहाटवीलकर या रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देत असतात. सामाजिक बांधिलकी राखून हे रहाटवीलकर दाम्पत्य बहुजन समाजात काम करीत आहेत. डॉ.तझिन रहाटवीलकर यांनी त्वचा रोगातून अनेक रुग्णांना मुक्त केले आहे. डॉ. तझिन यांची सामाजिक बांधिलकी विचारात घेत स्टेट बँक ऑफ इंडिया माणगाव शाखेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त त्यांना कर्तृत्वान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.