| पनवेल | वार्ताहर |
सोन्याच्या दुकानातील सोन्याची चेन आणि अंगठी असा 1 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल हातातून हिसकावून चोरट्याने पलायन केल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
जीतमल शर्मा यांचे कळंबोली सेक्टर 1 इ येथे रुचिता ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक अज्ञात व्यक्ती आला व त्याने सोन्याची चेन आणि अंगठी विकत घ्यायची आहे, असे सांगितले. त्यावर त्याला दुकानदाराने चेन आणि अंगठी दाखवली. दरम्यान, दुकानदार त्याला त्याची किंमत सांगत असताना या चोरट्याने त्याच्या हातातून चेन आणि अंगठी हिसकावून घेत दुकानातून पलायन केले. दुकानदाराने चोर चोर असा आरडाओरडा करत त्याचा पाठलाग केला असता, दक्ष नागरिकांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. मयूर प्रकाश बाड (रा. सेक्टर 5-ई, कळंबोली) असे त्याचे नाव असून तो मूळगाव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.