। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण गावातील मदनवाडी चौकातील पुलावरून अवजड कंटेनर कोसळून कंटेनरचालकाचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात शनिवारी (दि. 15) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.
हा कंटेनर सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालला होता. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने सेवा रस्त्यावर वीस फूट उंचीवरून तो खाली कोसळला. या अपघातात कंटेनरचा चक्काचूर झाला असून, कंटेनरचालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव (वय 37, रा. मुंबई मूळ उत्तर प्रदेश) याचा मृत्यू झाला आहे.