। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील सुपेगाव घाटात आज खडी भरलेला एक डंपर क्र.एम एच 04 एच 7531 तीव्र उतारावरील वळणावरील दरीत शंभर फुट खोल दरीत कोसळून डंपर चालक अ. सलाम सुलेमान तांडेल याचा मुर्त्यू झाला आहे. तर डंपरमधील एका कामगाराने बाहेर उडी मारल्याने तर दुसर्याला इतरांनी बाहेर काढल्यामुळे ते दोघेजण बचावले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि,मुरुड व रोहा तालुक्याला जोडणार्या सुपेगाव हा मार्ग अवघड वळणे व खोल दरीचा असल्याने येथे वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागते.फणसाड अभयारण्यातून हा मार्ग रोहा तालुक्याला जवळचा असल्याने वाहनचालक हा मार्ग निवडत असतात.
सदरचा डंपर दगडी खडी भरुन सकाळी अकरा वाजता नांदगाव येथून उसरोली-सुपेगाव मार्गे घाटातून रोह्याकडे जात होता.घाटातील शेवटच्या तीव्र उतारावरील वळणावर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटून समोरच्या जवळपास शंभर फूट खोल दरीत तो कोसळला.डम्पर खोल दरीत कोसळल्यामुळे चालक याला मोठी दुखापत झाल्याने त्यातच त्याचा मुत्यू झाला आहे.सदरची घटना मुरुड व रेवदंडा पोलीस ठाण्याला समजताच तातडीने पोलीस पोहचून मदत कार्य सुरु केले. जखमींना दवाखान्यात नेण्यात आले आहे. सदर घटनेची नोंद रेवदंडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत.