चालकाचा थरार! भरधाव ट्रकची घर, दुकानांना धडक

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेत रस्त्यालगत असणार्‍या घरांना व दुकानांना भरधाव कंटेनर ट्रकची धडक लागली. हा अपघात दि.22 जून रोजी रात्री 8.45 च्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद चिमणलाल भोगिलाल मेहता (79) रा. इंदापूर, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर अज्ञात कंटेनर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील फिर्यादी चिमणलाल भोगिलाल मेहता तसेच इतर इसमांच्या घरांना व दुकानांना सर अपघातामध्ये कंटेनर ट्रक क्र.सीजी/04/एनएम/9266 या गाडीवरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील कंटेनर ट्रक मुंबई-गोवा महामार्गाने गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे चालवीत इंदापूर गावच्या हद्दीत आल्यावर आरोपी अज्ञात चालकाने अतिवेगाने ट्रक चालवून रस्त्यालगत असलेले फिर्यादी व इतर इसमांच्या घरांना व दुकानांना धडक मारून अपघात करून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. तसेच तो याबाबतची पोलिसांत काही एक माहिती न देता तेथून पळून गेला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करुन ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. दोडकुलकर हे करीत आहेत.

Exit mobile version