| सुतारवाडी | प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षांपासून उनाड गुरांचा ठिय्या अनेक ठिकाणी मुख्यत्वे करून वाहनांच्या रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे अनेक वाहनांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे. विळा भागाड फाट्यावर असंख्य गुरांचा ठिय्या उभा असतो. येथून माणगावकडे जाणारी त्याचप्रमाणे कोलाड-पुणे या मार्गाकडे जाणारी अनेक लहान-मोठी वाहन रात्रंदिवस धावत असतात. त्याचप्रमाणे विळा भागाड परिसरामध्ये अनेक कंपन्या सुरू केल्या आहेत. अशा ठिकाणी कच्च्या मालाची ने-आण करण्यात येते. यासाठी असंख्य अवजड वाहन व त्याचप्रमाणे ट्रेलर रात्रंदिवस धावत असतात. मात्र गुरांच्या ठिय्या मांडून असलेली असल्यामुळे अनेक अवजड वाहनांना त्याचप्रमाणे पुणे-माणगावकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोकेदुखी होऊन बसली आहे. या उनाड मोकाट गुरांचा वाळी कोणी नसल्यामुळे बरं रात्रंदिवस रहदारीच्या रस्त्यावर उभी असतात. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने अनेक वेळेला ओळखणा करण्यात आल्या होत्या, अनेकवेळा वल्गना केल्या गेल्या होत्या. मात्र या वल्गना हवेतच राहिल्या. काळ्या रंगाची गुरे रात्रीच्या वेळी वाहनचालकाला दिसत नाहीत. त्यामुळे कधी कधी गुरांचा अपघात करून वाहन चालक पसार होतो. याकडे गुरांच्या मालकांनी लक्ष देणे आवश्यक असून आपली गुरे आपल्या गोठ्यात बांधून ठेवणे आवश्यक आहे.
भागाड फाट्यावर गुरांचा ठिय्या
