द्रोणागिरी श्री 2022 आयोजन

। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने द्रोणागिरो स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत,तसेच पावर हाऊस उरण यांनी सोमवार 03 जानेवारी रोजी द्रोणागिरी व द्रोणागिरी फिजिक 2022 ह्या हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा उरण येथे आयोजीत केल्या आहेत. तरी जिल्यातील तमाम शरीर सौष्ठवपटूंना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी ह्या स्पर्धांत सहभागी व्हावे. द्रोणागिरी फिजिक स्पर्धा दोन उंची गटात होईल .द्रोणागिरी फिजिक स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची निवड औरंगाबाद येथे होणार्‍या महाराष्ट्र फिजिक स्पर्धेसाठी होणार आहे. बोकडवीरा, चारफाटा, छचडएन मैदान, पेट्रोलपंपा जवळ, उरण येथे ही स्पर्धा संध्याकाळी 4.00 वा होणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष साखरे 9421164084, जीतेंद्र गुरव 9920444351 याना संपर्क साधावा. कोरोना बाबत अटी आल्यास स्पर्धा पुढे जाऊ शकते असे आयोजकांनी सागितले आहे.

Exit mobile version