अंमली पदार्थ विक्रेत्याला अटक

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथे अंमली व प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रेत्यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.

अलिबागमधील गोंधळपाडा त्याचप्रमाणे तळकरनगर या ठिकाणी अंमली व गुंगीकारक पदार्थ साठवून ठेवलेले एकूण ६४००० किंमतीचे प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्या दोघांवर अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपित क्र. २ ला ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास ससपोनि जाधव हे करीत आहेत आहेत.

Exit mobile version