| पनवेल | वार्ताहर |
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला क्राईम ब्रॅन्च कडून खारघर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खारघरमधील एका बंगल्यातून 16 नायजेरियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक कोटींचे ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर 12 मधील एका बंगल्यात गांजा पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या बंगल्यात धाड टाकत 6 महिला आणि 10 पुरुष असे एकूण 16 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कोटींचे ड्रग हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. नववर्षेच्या पूर्वसंध्येला पोलिसांकडून हि कारवाई करण्यात आली आहे.