अपुर्‍या निधीमुळे नाट्यगृह बांधकाम रखडले

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये नाट्यगृह बांधकाम करणेसाठी महाराष्ट्र शासनाचे संस्कृतीक कार्य विभागाकडून सुमारे चार कोटी रुपयाचे नाट्यगृह उभारणीसाठी पाच वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यापैकी प्रशाकीय मान्यतेचे अनुषंगाने शासन हिस्याच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम हि प्रथम हप्त्याची 1,49,04,088 रुपये वितरीत करण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला होता. या अनुदानापैकी 14,00,000 रुपये माणगाव नगरपंचायतीकडे 19 जून 2018 रोजी मिळाले होते. तसेच माणगाव नगरपंचायतीकडील स्वहीस्सा रक्कम रुपये 20,00,000 या कार्यालयाकडे एकूण 34,00,000 अनुदान सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. काम जास्त अनुदानाची रक्कम कमी मिळत असल्याने बांधकाम करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्याचबरोबर पाच वर्षापूर्वी मंजूर झालेल्या नाट्यगृहाचे इमारतीच्या अंदाजपत्रकात जो निधी मंजूर केला त्या निधीत हे नाट्यगृह उभारू शकत नाही. सध्या शासनाकडून एक कोटी 36 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी आला आहे. सध्या सर्वच बांधकाम साहित्याचे दर कित्येक पटीने वाढत आहेत. तसेच मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नाट्यगृह बांधकामाबाबतचा तिढा कायम राहणार आहे.  

या नाट्यगृहाची बालकणी वाढवून किमान 700 प्रेक्षक क्षमता केल्यास आयोजकांना दर्जेदार नाटके आणणे परवडेल अन्यथा हे नाट्यगृह सभा संम्मेलनासाठीच उपयुक्त ठरणार असल्याची चर्चा नाट्य रसिकातून बोलताना व्यक्त होत असून, प्रेक्षकातून या कमी क्षमतेच्या नाट्यगृहाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. या नाट्यगृहाची आसन क्षमता कमी असल्याने आयोजकांना दर्जेदार, नावाजलेली नाटके आणणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आवडीची, गाजलेली व दर्जेदार नाटके बघता येणार नाहीत. सध्या पनवेल, रोहा, महाड येथे नाट्यगृह आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, येथे नाट्यगृह आहेत. माणगावचे नाट्यगृह 500 बैठक आसन क्षमतेचे असल्याने तिकिटाचा दर आयोजकांना पर्यायानी वाढवावा लागणार असून हा खर्च उभा करण्यासाठी रसिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या नाट्यगृहाची आसन क्षमता वाढवून 700 किंवा 1000 केल्यास या नाट्यगृहात लहान-मोठे कार्यक्रम व दर्जेदार नाटक ठेवणे सोयीस्कर होईल.    

Exit mobile version