विमानतळ बांधकामाचा नागरिकांना प्रचंड त्रास

| उरण | वार्ताहर |

पनवेल तालुक्यात दगड मशीन, क्रेशर मशीन द्वारे कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून या कायदयाचे उलंघन थांबवावे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लगत असलेल्या गावाला होणारा त्रास थांबवण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय परिसरात बेकायदेशीर कामे करणार्‍या दगड मशीन, क्रेशर मशीन वर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील व त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हा खान अधिकारी अलिबाग, जिल्हा रायगड श्री. मेश्राम यांच्याकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रायगड जिल्हा, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सिडको, तहसीलदार पनवेल, सहाय्यक पोलीस आयुक्त नवी मुंबई, रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दादर, मुंबई आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून कायद्याचे उलंघण करणार्‍या क्रेशर मशीन व दगड मशीन मालक चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी चिंतामणी मुंगाजी, संजय तन्ना, रमेश पाटील, विजय ठाकूर,  सोनी बेबी, कार्यकर्ते कैलास माळी आदी  मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version