जिल्हा प्रशासन व खारभूमी खात्याने तातडीने लक्ष द्यावे – जनतेची मागणी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा गाव संरक्षण बंधाऱ्याला समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्यामुळे खांड गेल्याने खाऱ्या पाण्याने गाव जलमय झाले, तसेच काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अनेकांच्या तळावातील मच्छी वाहून गेली आहे. शासनाने सदरची बांधबंधिस्ती तातडीने भरावी अन्यथा भरतीच्या खाऱ्या पाण्याने व वरून पडणाच्या पावसाच्या गोड्या व खारे पाणी असा दुहेरी मारा झाल्यास भिषण परिस्थिती ओढवू शकते. जिवित हानीची शक्यता आहे. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी तहसिलदार अलिबाग, खारभूमि अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ निर्णय घेवून सदर प्रत मार्गी लावावे अशी जनतेची जोरदार मागणी होत आहे.