शहरीकरणामुळे गुढी झाल्या लहान

अनंत कर्वे यांनी जोपासली कला

| नेरळ | प्रतिनिधी |

गुढी पाडवा हा हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जाणारा सण आहे. या सणाच्या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा आहे. परंतु, शहरीकरणामुळे फ्लॅट संस्कृती आली आणि गुढीचा आकार लहान झाला. अशा लहान आकाराच्या गुढी उभारण्याचे कार्य 81 वर्षीय कलाकार अनंत कर्वे यांनी अविरत सुरू ठेवले आहे.

गुढी पाडवा साजरा करताना एका उंच काठीला रंगीत कापड लावून, तिला सजवून त्यावर तांब्या अडकवून गुढी उभारली जाते. ती गुढी घराच्या खिडकीतून गुढी बाहेर काढली जाते. पुर्वीची घरे मोठंमोठी असायची. तसेच, चाळीतील घरांपुढे देखील गुढी उभारली जायाची. मात्र, आता चाळींची जागा इमारतींनी घेतल्यामुळे घरासमोरील जागा कमी झाली असून सदनिकेत आपण बंदिस्त झालो आहोत. त्यामुळे सदनिकेत अशा प्रकारे गुढी उभारण शक्य होत नाही आणि मुलांनाही या गोष्टी आता बघायलाही मिळत नाही. त्यामुळे नेरळ येथील निवृत्तीचे जीवन जगणारे अनंत कर्वे यांच्याकडून अनेक दशके टाकावू गोष्टींपासून पर्यावरण पुरक गुढी बनवल्या जात आहेत.

Exit mobile version