चौक गावाजवळ डंपरला आग

| रसायनी | वार्ताहर |

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळ एका धावत्या डंपरला अचानकपणे आग लागून या आगीत डंपरची पुढील केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. तर आगीची भीषणता पाहून काही काळ या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली होती. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील चौक गावाजवळ करंजाडे येथून कर्जंतकडे माल घेऊन जाणारा एमएच 46 बीएफ 6564 या डंपरला आग लागली. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने डंपरमधून बाहेर उडी मारल्याने सुदैवाने बचावला. या आगीत डंपरची पुढील केबिन जळून खाक झाल्याने डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 30 मिनिटे आग सुरू राहिल्यानंतर पाण्याच्या टँकर व अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Exit mobile version