मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य

वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका; आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

। गोवे -कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गवरील कोलाड ते नागोठणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, वाहनचालकांसह प्रवाशांच्यास जिवाला धोका निर्माण झाला आहे. या धुळीमुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हा धुरळा प्रवासी व वाहनचालकांच्या नाकातोंडात जाऊन अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय हॉटेल, भाजी विक्रेते, पानटपरी व इतर व्यावसायिकांच्या दुकानात धुळ उडत असल्यामुळे हॉटेल किंवा दुकानात ग्राहकांचा ओघ मंदावला आहे.

महामार्गावरील गेली तेरा वर्षांपासून परिस्थिती पाहता अतिशय बिकट झाली असून या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे आहे. या मार्गावरून प्रवास करताना मणक्याचे आजार, कंबरदुखी, डोळे व श्‍वसनाचा त्रास व इतर आजाराना सामोरे जावे लागत आहे.

अनंत सानप
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version