इच्छुकांनी 21 मेपूर्वी नोंदणी करावी; उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवाहन
| पेण | वार्ताहर |
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्या वतीने मोटार वाहन कायदा 1988 व मुंबई मोटार वाहन कर नियम 1958 अन्वये जप्त करण्यात आलेल्या 60 वाहनांचा ई-लिलाव दि. 27 मे रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये कराधान प्राधिकार्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून घेण्यात येत आहे.
ई-लिलावात भाग घेणार्या इच्छुकांनी 34 हजार नोंदणी शुल्क (ना परतावा) आणि रु. 4 लाख 94 हजार ठेव रक्कम (परतावा) द्वारा “Dy RTO PEN’ या नावाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे भरावयाची आहे. लिलावाची सविस्तर माहिती व अटी :http://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर दि. 16 मेपासून उपलब्ध आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पेण यांनी कोणतेही कारण न देता लिलाव रद्द अथवा तहकूब करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत. इच्छुकांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून आणि अटी-शर्तींची पूर्तता करून लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-लिलावाचे वेळापत्रक
नोंदणी सुरूवात: 20 मे 2025 सकाळी 10 वाजता
नोंदणी समाप्ती: 21 मे 2025 दुपारी 5 वाजता.
कागदपत्र पडताळणी व मंजुरी: 22 मे 2025 सकाळी 11 वाजता
वाहने पाहणीची वेळ:
सुरुवात: 17 मे 2025 सकाळी 10 वाजता
शेवट: 25 मे 2025 सायंकाळी 6 वाजता
ई-लिलाव दिनांक: 27 मे 2025
वेळ: दुपारी 12 ते 2 वाजता