| माथेरान | वार्ताहर | पावसाळ्यात कधी नव्हे एवढी प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत असून याचे मुख्य कारण म्हणजे इथे स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणारी पर्यावरणपूरक ई-रिक्षा आहे. ज्या आबालवृद्ध मंडळींना माथेरानला येण्याची अनेक वर्षांपासून प्रबळ इच्छा होती, त्यांना ह्या सेवेमुळे अगदी सहजपणे दस्तुरी नाक्यावरून माथेरान स्टेशनपर्यंत केवळ माफक दरात 35 रुपयांत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ त्याचप्रमाणे दिव्यांग पर्यटक समाधान व्यक्त करीत आहेत.