। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील मुगवली फाट्याजवळ एका भरधाव वेगाने येणार्या इको गाडीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. सलोनी संजय भोसले (देवळी कोंड-माणगाव) असे त्या तरूणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलोनी भोसले ही माणगाव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर आपली दुचाकी उजव्या बाजूला वळवत असताना पाठीमागून एक इको गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात सलोनी भोसलेचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दुसर्या दुचाकीवरील चालक वैभव भोजने (25) व जान्हवी उंडरे (18) हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे व पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात अली आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करीत आहेत.