। पाली/ वाघोशी । वार्ताहर ।
ग्रुप ग्रामपंचायत महागाव अंतर्गत विविध व्यवस्थापन कमिटी नेमल्या जातात. त्यामध्ये महागाव ग्रामपंचायतच्या भोवताली वनविभाग मोठ्या प्रमाणात असल्याकारणान, वनव्यवस्थापन कमिटी महत्त्वाची समजली जाते. ग्रुप ग्रामपंचायत महागावमध्ये झालेल्या ग्रामसभेत मंगळवारी (दि.6) वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापन समिती नव्याने गठित करण्यात आली. त्यामध्ये रमेश जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, किसन गावारने यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर रामि भला, तृप्ती शिर्के, लीना पवार, महेंद्र धानिवले, गंगू पवार, पांडुरंग कांबळे, सदाशिव पवार, कैलास लोलगे, राजेश भगत, शांताराम घाटवळ, परशुराम निरगुडे, हिरामण माडे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. तर वन विभागाचे अधिकारी पाटील यांची सचिवपदी निवड करण्यात आली. ही बैठक सरपंच दीपिका सुतार, उपसरपंच महेंद्र धानिवले व ग्रामपंचायत अधिकारी नितीन भोसले यांच्या नेतृत्वात संपन्न झाली.