अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यात त्यांनी चालू आर्थिक वर्षात जीडीपी 9.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर कमी होऊन तो 8 ते 8.5 टक्के इतका राहील असे म्हटले आहे. देशाचा आर्थिक पाहणी अहवालासंदर्भात सविस्तर माहिती प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही.अनंत नागेश्वरन हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सेवा क्षेत्रात वाढीचा दर हा 8.9 टक्के राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.