। मुंबई । प्रथिनधी ।
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थान ईडीने मोठी कारवाई केलीय. जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.







