। नवीन पनवेल । वार्ताहर ।
उमरोली येथे दोन महिन्यांपूर्वी बनवलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. उमरोली सिमेंट काँक्रिटीकरणचा 300 मीटरचा हा रस्ता असून रस्ता एप्रिल २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आला. टेमघर ते उमरोली रस्ता दुरुस्त करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद रायगड- अलिबाग फंडातून निधी मंजूर झालेला आहे. मात्र या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याची दोन महिन्यातच खडी वर येऊ लागली आहे. रस्त्याला खड्डे पडल्याने ठेकेदाराने हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याचा आरोप केला जात आहे.