| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
बालिका दिनानिमित्त रजिप आदर्श शाळा नवघर शाळेत ‘लेक शिकवा अभियान’ प्रारंभ आणि बालविवाह मुक्त महाराष्ट्र संकल्प कार्यक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बालपण वाचवा-बालविवाह घालवा, मुलगी शिकली-प्रगती झाली अशा विविध घोषणा दिल्या गेल्या, तसेच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली गेली. शाळेतील विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले यांच्या वेषात सज्ज होऊन आपले मनोगत, गाणी, चारोळ्या व्यक्त केल्या, तर मुले महात्मा जोतिराव फुले यांच्या वेषात येऊन त्यांचे विचार मांडले. सखी सावित्री समितीच्या सदस्या, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शाळेतील सर्व महिला शिक्षिकांनी आपले मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी ‘लेक शिकवा अभियान’चा शुभारंभ केला. बालविवाहमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक संगीता बैकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यकमाचे महत्व सांगितले.







