धगडवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न

। सुतारवाडी । वार्ताहर ।

रा.जि.प. शाळा धगडवाडी रोहा येथे मासिक शिक्षण परिषद गटशिक्षणाधिकार मेघना धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंदन जाधव यांनी केले. केंद्रस्तरीय निपुण भारत अभियान कार्यक्रमात प्रथम क्रमांक कामथ, द्वितीय क्रमांक येरळ व तृतीय क्रमांक चिंचवली तर्फे आतोणे शाळेने मिळवले. विजेते शाळांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी ‘समग्र प्रगती पुस्तक’ भागवत भुसारे, सी.सी.ई. मार्गदर्शन प्रशांत वाघचौरे तर ‘व्यावसायिक मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन’ या विषयी अरुण शेळके यांनी सखोल माहिती दिली.

Exit mobile version