। सुतारवाडी । प्रतिनिधी ।
रा.जि.प.शाळा जामगाव येथे (दि.22) कुडली केंद्राची शिक्षण परिषद घेण्यात आली. सुरुवातीला सावित्राबाई फुले व जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कुडली केंद्राचे केंद्रप्रमुख उमेश महाडेश्वर उपस्थित शिक्षकांचे स्वागत केले. यावेळी विज्ञान दिनाबद्दल चर्चा करण्यात आली. त्यात शिक्षकांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. तसेच, लोकसहभाग या विषयावर बडे सर, कला क्रीडा या विषयावर ढाकणे सर, तर स्थानिक गरजेनुसार आदिवासी शाळा गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न या विषयावर भोर सर आदींनी विस्तृत माहिती सांगितली.
या शिक्षण परिषदेस उमेश माडेश्वर, राजेंद्र म्हात्रे, सुशीला म्हात्रे, मोहन राठोड, अनिल नागरगोजे, सुचेता रामधरणे, अविनाश पाटील, प्रिया टोकसे राजश्री पाखरे, प्रतीक्षा बडे, बाळासाहेब बडे, राजेंद्र भोर, बाळासाहेब ढाकणे, गोपू मोटे आदी विविध शाळांतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.