शिक्षक आंदोलनामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ

खालापूर तालुक्यातील शाळा बंद

| रसायनी | वार्ताहर |

बुधवारी शिक्षकांच्या आंदोलनामुळे सर्व शाळा बंद राहिल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील शिक्षकांचा आक्रोश मोर्चा अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा,20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणार्‍या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे. सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व सन 2004 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांना/ शासकीय कर्मचार्‍याना 1982 ची पेन्शन आदेश निर्गमित करावेत, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अ विलंब मिळावेत,2024-25 वर्षात राबविली गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी.

अद्यापही अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. त्याठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके व पुरवावीत. पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्व शिक्षक संपावर गेल्याने आजच्या दिवशी शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला दिसत होता.

Exit mobile version