चिंताजनक! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने आता चिंता वाढली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड यांनी सांगितले कि, मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणे जाणवू लागली. माझी प्रकृती सध्या स्थिर असून मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version