सक्षमतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सक्षम एज्युकेशन सोसायटीमार्फत श्रीगाण आदिवासीवाडी येथे बालवाडी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या 45 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच आर्थिक अडचणीवर मात करत उच्च शिक्षण घेणार्‍या प्रियांका नाईक व प्रगती नाईक या दोन प्रतिभावान विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांची शैक्षणिक मदत करण्यात आली.

सिद्धीज् फिटनेस क्लब, चोंढीच्या संचालिका सिद्धी वाकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या आर्थिक मदतीतून श्रीगाण आदिवासीवाडी येथे 45 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, तर सूचित शैलजा रमाकांत कुलकर्णी व अमोघ उमालकर यांच्या आर्थिक मदतीतून वरील दोन हुशार विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच चोंढी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका छाया काळे यांच्या आर्थिक मदतीतून उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
हा कार्यक्रम देवेंद्र केळुस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक कार्यकर्ती तथा नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी तैसीन अहमद छापेकर यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला. यावेळी सक्षमचे सचिव प्रतिम सुतार यांनी प्रास्ताविक, तर अध्यक्ष शार्दुल काठे, गणेश आमले, छाया काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष मोकल यांनी निवेदन, तर पूजा पाटील सुतार यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी सक्षमचे सदस्य विशाल आमले, वासुदेव आमले, विवेक पाटील, शुभांगी कुलकर्णी, छाया म्हात्रे, संध्या वाकडे, उत्कर्ष घरत, प्रजय म्हात्रे तसेच विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Exit mobile version