मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न

। पेण । प्रतिनिधी ।

पेण तालुक्यातील मतदाराची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने तहसिलदार तानाजी शेजाळ सर्व स्थरातून प्रयत्न करत आहेत. यावेळी प्रांत कार्यालय पेण येथे विटभट्टी व्यवसायीक, हॉटेल मालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत निवडणूकीच्या दिवशी भट्टी व्यवसायीकांनी आपल्या कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे तसेच कामगारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तर, हॉटेल मालकांनी देखील कामगारांना काही वेळेसाठी सुट्टी देउन मतदान करण्यास प्रवृत्त करावे. तसेच, हॉटेलमध्ये मतदान जनजागृतीपर जाहिरात फलक लावावेत अशा सुचना करण्यात आल्या. या बैठकीसाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विटभट्टी मालक तसेच हॉटेल मालक हजर होते.

Exit mobile version