माथेरानमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने ईद-ए-मिलादचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम मोहल्ला परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघाला होता. ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला. वाजत-गाजत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत तरुणांसह आबालवृद्ध आणि लहान मुले मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक प्रविण सकपाळ, नगरसेवक किशोर मोरे आणि नगरसेविका अनिता रांजाणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा वाढली. संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपत समाजातील सर्वच नागरिकांनी एकत्र येऊन हा पवित्र सण उत्साहात साजरा केला. ईद-ए-मिलादच्या निमित्ताने समाजातील एकोपा, बंधुभाव आणि परस्पर सद्भावनेचे दर्शन घडले. तसेच, ईद-ए-मिलादनिमित्त विशेष धार्मिक व्याख्यानांचे व संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version