एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या बंडखोरीबाबत आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं असून मोठा गौप्यस्फोटही केला आहे. भाजप आणि शिंदे गट यांची आज नव्हे तर आधीपासूनच अलिखित छुपी युती होती, असा आरोप खडसे यांनी केला आहे.

Exit mobile version