| महाड | प्रतिनिधी |
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 26) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, खा. ज्योती वाघमारे, जि.प. सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदेंकडून चवदार तळ्याची पाहणी
