‌‘एकता’मुळे आदिवासींची दिवाळी गोड

| पनवेल | प्रतिनिधी |

पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचबरोबर रोजच्या चटणी-भाकरीसाठी वणवण करणाऱ्या या गरिबांच्या घरीसुद्धा दिवाळीचा सण साजरा व्हावा, या उद्देशाने कामोठेमधील एकता सामाजिक संस्थेच्या वतीने पेण तालुक्यातील उंबरमाळ, केळीची वाडी, काजूची वाडी आणि खऊस वाडी या पाड्यांवरील 110 आदिवासी कुटुंबांना एक किलो रवा, एक किलो मैदा, एक किलो साखर, एक लीटर गोडेतेल, अर्धा किलो डालडा आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी एकता सामाजिक संस्थेचे अमोल शितोळे, डॉ. मनोजकुमार शेट्ये, महेश चव्हाण, देवेंद्र उकळी, सूरज गोविलकर, गणेश चौकेकर, हरीश बाबरिया, शीतल शितोळे, श्रद्धा लुडबे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजित चोकेकर, आई भवानी मित्रमंडळ, सेक्टर 12 कामोठे, नारायण गोरे, उमेश नाईक, विठ्ठल इप्ते, उषा डुकरे, उमेश गायकवाड, संगीता काका पवार, पंकज ननावरे, नामदेव चौकेकर, रवींद्र जाधव, शिवांश बिटला, मयुरेश बंडकर, सत्यवान वारिक, सुरेखा शेट्टी, रेखा शेट्टी, प्रसाद तेली, दीपा राजेंद्र खरात, शेखर जगताप, जयेश्री झा, निलेश खावडे, अमोल गोडसे, राहुल बजाज, विशाखा मोरे, मेघा हजारे, राजेंद्र परब, आरती सहाने, त्रूनाली शहा, संपत शेट्टी, हिरा भट, रिधेश शेलार, योगेश चव्हाण, साईनाथ खानोलकर, श्रद्धा सावंत, परेश चव्हाण, महेश कदम, प्रसाद शेट्ये, दीप्ती खंडेवाल आदींनी भरीव योगदान दिले.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, बाळग्राम तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थाचे सदस्य यांनी सदर पाड्यांवरील आदिवासींबरोबर संपर्क करून मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version