| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
सिडको प्रशासना मार्फत कामोठे वसाहतीत बांधण्यात आलेल्या समाज सेवा केंद्रात पालिकेचा कारभार सुरू आहे. हे समाजसेवा केंद्र नागरिकांना मंगल कार्यासाठी, सामाजिक उपक्रमासाठी खुले करावे, अन्यथा पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा एकता सामाजिक संस्थेने दिला आहे.
शहरात नागरिकांना मंगल कार्य आणि सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासाठी सभागृह भाडेतत्त्वावर घ्यावे लागत असल्याने नागरिकांनी सिडकोकडे समाजसेवा केंद्रा मागणी केली होती. सिडकोने सेक्टर 21 येथे सुमारे 4 कोटी खर्च करून बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम 2018 मध्ये पूर्ण केले. महानगरपालिकेने या इमारतीत वैद्यकीय सेवा केंद्र आणि डेटा सेंटर सुरू केले आहे. एकता सामाजिक संस्थेने समाजसेवा केंद्र लोकांसाठी उपलब्ध करण्यासाठी मागील पाच वर्षापासून सिडको, पनवेल महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. समाजसेवा केंद्र नागरिकांसाठी खुले नसल्याने अमोल शितोळे यांनी 19 जूनला लक्षणीय उपोषणाचा इशारा दिला आहे.