। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील भाल ते कार्ल्यातील एकविरा देवी मंदिर असा पायी दिंडी पालखी सोहळा निघाला आहे. गुरुवारी (दि. 16 जून) सकाळी 8 वाजता भाल येथील आईच्या मंदिरात देवीची आरती करून पायी दिंडी पालखी प्रस्थान झाली. भाल ते क्षेत्र एकविरादेवी पालखीसह पायी दिंडी सोहळ्याचे हे 15 वे वर्ष आहे. ही पालखी भाल, कनकेश्वर, एमआयडीसी रोड, पेझारी, पोयनाड, पेण, खोपोली, खंडाळा घाटातून पायी जात असताना पोयनाड, पेण – सावरसई बापदेव, खोपोली – महाजन हॉल, तुकाराम पादुका दुपारचा महाप्रसाद असे थांबे घेत सोमवारी (दि.20 जून) सायंकाळी 6 वाजता एकविरा देवस्थान येथे पोहचून कार्ला डोंगरावर होम हवन व पूजा करण्यात येणार आहे.