| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा बाजूकडून मुरूडकडे परप्रांतिय मोटर सायकलस्वाराच्या धडकेत जैन मंदिरातून घरी पायी जात असलेल्या एका वयोवृध्द इसमाचा अपघात घडला. या अपघातात रेवदंडा व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष व वयोवृध्द जैन व्यापारी पारसमल बाबूलाल जैन जबर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रेवदंडा शहरात खळबळ उडाली.
रेवदंडा जैन मंदिर येथून दि.3 ऑक्टोबर रोजी रात्री आठचे सुमारास बाजारपेठेतील ज्येष्ठ व्यापारी तथा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष 75 वर्षीय पारसमल बाबूलाल जैन, हे जैन मंदिर येथून घरी पायी परतत असताना, रेवदंडा येथून मुरूडच्या दिशेने सुसाट वेगाने होंडा शाईन कंपनीचे मोटर सायकल ने जात असताना मासेमारी व्यावसायिक (23) रत्नेश रामबाबू निशाद (सध्या रा. रेवदंडा मोठे बंदर, व मुळ राहणार साधापुर देवढ, जि.सुलतानपुर, उत्तरप्रदेश) यांनी रेवदंडा बाजारपेठेत डाँ. अमर पाटील यांच्या दवाखान्या समोर पारसमल जैन यांना जोरदार ठोकर मारून अपघात केला. या अपघातात पारसमल बाबुलाल जैन गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकांत किरविले यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा नोंदविला.
दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
