। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
जयसिंगपूर शहरातील बसस्थानकात झालेल्या अपघातात सोलापूर-कोल्हापूर जाणार्या एसटीखाली चिरडून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. पंडित गणपती पाटील (वय 76, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे.
हा अपघात बुधवारी (दि. 02) सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. याप्रकरणी एसटीचालक सुलेमान अकबर पटेल (सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पंडित पाटील एसटीने जयसिंगपूर बसस्थानकात उतरून बस आत येण्याच्या मार्गावरून बाहेर चालत जात होते. यावेळी स्थानकात येणार्या सोलापूर-कोल्हापूर बसने पाटील यांना धडक दिली. यात एसटीचे डाव्या बाजूचे पुढील चाक त्यांच्या पायावरून गेल्याने दोन्ही पाय चिरडून ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.