माजी आमदार धैर्यशील पाटील
| पेण | प्रतिनिधी |
कोकण शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यासारख्या सर्वगुणसंपन्न उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन माजी आ. धैर्यशील पाटील यांनी केले. पेण येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, या व्यक्तीची राजकीय कारकीर्द पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, पंचयात समिती सदस्यापासून ते आमदार यापदापर्यंत निष्कलंक आणि भ्रष्टाचारविरहित असलेले उमेदवार आहेत. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथमच सर्व शिक्षक आमदार यांना एकत्र करुन शैक्षणिक क्षेत्रातल्या समस्या सोडविल्या. विनाआनुदानित तत्त्वांवर काम करणार्या लाखो शिक्षकांना अनुदानित तत्त्वाखाली आणण्यासाठी प्रामणिक प्रयत्न केले व यशही संपादन केले. पुण्यातील भिडेवाडा ते मंत्रालय अशी शिक्षक आमदारांची पदयात्रा काढून शासनाचे लक्ष शिक्षकांच्या मागण्यांकडे केंद्रित केले. आजच्या घडीला प्रशासकीय अनुभव एवढे मोठे आहे की, ते अभ्यासपूर्ण शिक्षकांची बाजू विधिमंडळात मांडतात. त्यामुळे भविष्यात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वगुणसंपन्न असणार्या बाळाराम पाटील यांना मतदान करुन निवडून देऊया.
यावेळी बाळाराम पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे काँग्रेसकडून अशोक मोकल, शिवसेनेकडून नरेश गावंड, दिपश्री पोटफोडे, राष्ट्रावादीकडून सागर हजारे, शेकापच्या अॅड. निलीमा पाटील, माजी जि.प. सदस्य डी.बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेविका ममता पाटील, नगरसेविका सुनिता जोशी, नगरसेवक संतोष पाटील, नरेंद्र पाटील, निलकंठ पाटील, संदेश ठाकूर, सुजित पाटील, दिलीप पाटील, रमेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पेण शहरातील सर्व शाळांच्या शिक्षकांना भेटून बाळाराम पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले.