। अलिबाग । प्रतिनिधी ।
कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन 2022-23 ते 2027-28 कालावधीतचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था मुरूड यांनी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार दि.09/06/2022 ते 15/06/2022 या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरणेची मुदत आहे. दि.16/06/2022 रोजी छाननी असून वैध नामनिर्देशन अर्ज दि.17/06/2022 रोजी जाहिर केले जाती. मतदानाची तारीख दि.10/07/2022 रोजी निश्चित केली आहे. या कार्यक्रम मुख्यालयाचे नोटीस बोर्डावर, सर्व शाखांचे नोटीस बोर्डावर दि.08/06/2022 रोजी प्रसिद्ध केला आहे. तसेच यासबंधीची सर्व माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सी.ओ.कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अलिबाग, हेडगेवार सभागृह येथे उपलब्ध होऊ शकेल.