कर्जत पालिका विषय समिती सभापती निवड

। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेच्या विषय समित्यांची सोमवारी (14 फेब्रुवारी) निवड करण्यात आली आहे. या चारही समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सभापती विराजमान झाले आहेत, चारही सभापती बिनविरोध विराजमान झाल्याने महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
नगरपरिषदेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक कामकाज कामी सहाय्यक पीठासीन अधिकारी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सहकार्य केले.नगर परिषदेमध्ये 18 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 नगरसेवक शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीकडे आहेत तर 8 नगरसेवक राष्ट्रवादी-मनसे-स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी-शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.

विषय समिती सभापती
आरोग्य समिती सभापती उपनगराध्यक्ष-अशोक ओसवाल, सदस्य-बळवंत घुमरे,विवेक दांडेकर, शरद लाड,ज्योती मेंगाळ.
पाणीपुरवठा सभापती-प्राची डेरवणकर,सदस्य-विवेक दांडेकर, वैशाली मोरे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन(पाटील).
बांधकाम सभापती-राहुल डाळींबकर, सदस्य-नितिन सावंत, संचिता पाटील, उमेश गायकवाड,सोमनाथ ठोंबरे.
महिला व बालकल्याण सभापती-विशाखा जिनगरे,उपसभापती-संचिता पाटील सदस्य- स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, भारती पालकर.
स्थायी सभापती -अध्यक्ष सुवर्णा जोशी, सदस्य – अशोक ओसवाल,प्राची डेरवणकर,राहुल डाळींबकर, विशाखा जिनगरे

Exit mobile version