रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील यांची निवड

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणी सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील ह्यांची निवड करण्याची घोषणा केली. निवड झालेबद्दल पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मा उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरे, अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, रोहा तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, जिल्हा चिटणीस चारुहास मगर, पेण तालुकाध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version