। रसायनी । राकेश खराडे ।
कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या नलिनी कारंदे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्तझालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी प्रमिला योगेश पाटील यांनी उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज भरला होता. निवडणूक कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारती चितळे आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांनी पाटील यांच्या नावाची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले. याप्रसंगी अरुण भगत, विजय मुरकुटे, किरण माळी, राजेंद्र पाटील, अॅड.संजय टेबें, अमित जाधव, भूपेंद्र पाटील, सुनील माळी, महादेव कांबळे, योगेश पाटील, बंडू मोडक, श्रीकांत पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश पाटील, धनाजी ठोंबरे, भानुदास माळी ग्रामपंचायत सदस्य मुकेश पाटील, नितेश कारंदे, सदस्या मीनल ठोंबरे, यशश्री मुरकुटे, नलिनी कारंदे,रेवती भोईर, सदस्य संतोष म्हात्रे, माधुरी चितळे, रविंद्र चितळे, बबन पाटील, योगेश मुरकुटे आदी उपस्थित होते.