रायगडात मविआच्या माध्यमातून निवडणुका

खा. सुनील तटकरे यांचे स्पष्ट संकेत
। खोपोली । वार्ताहर ।

खोपोली नगरपालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचे स्पष्ट संकेत खा. सुनील तटकरे यांनी दिले आहेत. सोमवारी खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता येईल असा विश्‍वासही व्यक्त करताना कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेशच दिलेत.

तटकरे खोपोली नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खोपोलीत आले होते. माजी आ.सुरेश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. खा.तटकरे काय बोलतायेत याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. तटकरेंनी मागच्या काहीवर्षाचा लेखा जोखा मांडला. समविचारी पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवली जाईल ,पूर्ण ताकद लावून आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, तालुकाध्यक्ष नरेश पाटील, ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष बैलमारे, शहराध्यक्ष मनेश यादव, युवक अध्यक्ष अतुल पाटील, महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, माजी नगरसेवक मोहनऔसरमल, तुकाराम साबळे यांच्यासह माजी लोकप्रतींनिधी, पदाधिकारी महिला आणि पुरुष कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version