धामणीचा वीज पुरवठा सुरळीत

। खोपोली । वार्ताहर ।
परतीच्या पावसाने खालापूर तालुक्यातील धामणी गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे पाणीपुरवठा योजनाही बंद झाल्याने ऐन गणेशोत्सवात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र येथील लोकप्रतिनिधींनी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांकडे कैफियत मांडून पाठपुरावा केल्याने धामणी गावात वीज पुरवठा सुरळीत करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

वीज पुरवठा सुरळीत करावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सीमा चिले, वर्षा लोते, संतोष चिले, रामा लोते, प्रशांत साबळे, मनोराणी लोते, सुमन लोते, यशवंत लोते, कुलदीप लोते, कृष्णा पवार, प्रमोद लोते, चंद्रकांत लोते, ज्ञानेश्‍वर लोते, अमित साबळे आदिंनी महावितरणचे खालापूर उपअभियंता विकास गायकवाड यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

वादळी वार्‍सासह मुसळधार कोसळणार्‍या पावसाचा फटका परिसरातील गावांना बसला. यामध्ये तारा तुटणे, ट्रान्सफार्म बिघडणे यामुळे वीज मंडळाचे मोठे नुकसान झाले. मात्र अथक प्रयत्नानंतर धामणी गावातील वीज पुरवठा सुरळीत झाला. आदिवासी वाडीतील समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे उपकार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी सांगितले.

Exit mobile version