| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चाणजे, चिरनेर, मोठी जुई सह इतर ग्रामपंचायत हद्दीत हत्तीरोगाचे रुग्ण आढळून येत आहेत. हत्तीरोगाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामपंचायत स्तरावर शिबीरे राबवून डायथिलकाबीमाझिन ( डीईसी) या गोळ्यांचे वाटप रुग्णांना करण्यात यावे अशी मागणी संबंधित नातेवाईक करत आहेत.
हत्तीरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून 10 वर्षांपूर्वी तालुक्यात जनजागृती, सर्व्हे करण्यात आले होते. यावेळी चाणजे, चिरनेर, मोठे भोम परिसरात हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी डायथिलकाबीमाझिन ( डीईसी) गोळ्यांचे वाटप करण्यात आले नसल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे. तरी तालुक्यात पसरत असलेल्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.