खालापूर येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील ढेकू येथे शिवजयंती निमित्ताने विध्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. रामदास पाटील यांच्या हस्ते विजयी झालेल्या विद्यार्थांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. ढेकू येथे गेली बारा वर्षे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी या परिसरातील विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व उत्तमप्रकारे करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे ह.भ.प. रामदास पाटील, नरेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांक आरोही चौधरी, द्वितीय क्रमांक अक्षरा गावडे तर तृतीय क्रमांक जीवन पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संदीप पाटील, अजित देशमुख, विनोद खवले, प्रकाश पाटील, सनी यादव, प्रसाद पाटनील सुखदरे, पांडुरंग कदम, दत्ता पुरी, भाऊ गायकवाड, राकेश जाधव, अमर मानकावळे, अमोल देशमुख यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version