डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा


। कर्जत । प्रतिनिधी ।
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर विचारमंच नाना मास्तर नगर यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. कर्जत तालुका शाळा नंबर एक या शाळेत आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यासाठी ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर आठवी ते 10 वी च्या विद्यार्थ्यासाठी राष्ट्रकार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे विषय निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत कर्जत शहर व कर्जत शेजारील गावातील खाजगी आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन कर्जत मधील सुमंतु हॉस्पिटलचे डॉ. सुनील ढवळे यांनी केले. त्यावेळी कार्यक्रमाला फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे ज्येष्ठ सल्लागार रमेश खैरे आणि अ‍ॅड.तुकाराम ढोले, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे कार्याध्यक्ष विजय जगताप, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मनोहर भोसले तसेच सामाजिक कार्यकर्ते हरिशचंद्र जाधव, अमोल रोकडे, शुभम अष्टेकर, सिद्धार्थ ढोले, अल्पेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे कार्यकारी सदस्य मालू गायकवाड, संजय अष्टेकर आणि शिवाजी कावरे यांनी उत्तम नियोजन केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मालू गायकवाड यांनी आणि आभार शिवाजी कावरे यांनी मानले.

Exit mobile version